मतदानानंतर पोहोचले 'इव्हीएम'; तहसिलदार निलंबित

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीचा नियोजित कालावधी गेल्यानंतर 48 तासांनंतर राखीव इव्हीएम मशिन्स पोचले. हा गंभीर प्रकार समोर आल्याने नायब तहसिलदारास निलंबित करण्यात आले. या प्रकारानंतर काँग्रेसकडून भाजपवर टीका केली जात आहे. मतदानानंतर सागर मुख्यालयात काल (शनिवार) पोहोचले. तसेच येथील स्ट्राँगरुममध्ये दोन तासांहून अधिक काळासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडले होते. 

इव्हीएम मशिन्स उशीरा पोचल्यानंतर या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी कांताराव यांनी सर्व मतदान यंत्रे सुरक्षित आणि सीलबंद असल्याचे सांगत मतदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. तसेच ही मतदान यंत्रे उशीरा पोहोचल्याने सागरचे नायब तहसिलदारांना निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकार समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखलही घेतली आहे.
 
Web Title: EVM Reached after voting Tahsildar suspended