Video: बलात्काराचा बदला बलात्काराने...

वृत्तसंस्था
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

खूनाच्या बदल्यात खून आणि बलात्काराचा बदला बलात्कारने घ्यायला हवा,

नवी दिल्ली: खूनाच्या बदल्यात खून आणि बलात्काराचा बदला बलात्कारने घ्यायला हवा, असे वक्तव्य माजी लष्करी अधिकाऱयाने केले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी टीकेची झो़ड उठवली आहे.

एका वृत्त वाहिनीने काश्मीरी पंडितांवरील अत्याचारासंदर्भात चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या पाच जणांमध्ये निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल एस. पी. सिन्हा सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान सिन्हा म्हणाले, खूनाच्या बदल्यात खून आणि बलात्काराच्या बदली बलात्कार. सिन्हा यांच्या या विधानानंतर निवेदकासह सर्वजण संतप्त झाले. प्रथम महिला अँकरने सिन्हा यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण ते काही केल्या ऐकण्यास तयार झाले नाहीत. चर्चेत सहभागी झालेल्या अन्य चौघांनीही सिन्हा यांच्या विधानावर आक्षेप घेतला.

दरम्यान, सिन्हा यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुमार विश्वास यांनी व्हिडिओ शेअर करताना नाराजी व्यक्त केली आहे. सिन्हा यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे लष्करातून निवृत्त झालेल्या अनेक अधिकाऱ्यांनीही म्हटले आहे. लेफ्टनंट जनरल निवृत्त सैयद अता सहनैन, माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनी देखील हे विधान दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे भारतीय लष्कराची प्रतिमा खराब झाल्याची प्रतिक्रिया लेफ्टनंट कर्नल संदीप परीजा यांनी दिली. शिवाय, परीजा यांनी सिन्हा यांचे मेजर जनरल ही रँक परत घेण्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex Army officer wants death for death and rape for rape in favour of Kashmiri Pandits