काँग्रेस विसर्जनाचे महात्मा गांधीचे आवाहन मोदी पाळत आहेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मार्च 2019

मंड्यामध्ये लोकसभेसाठी अद्याप उमेदवार निश्‍चित नाही. पण, अभिनेते अंबरीष यांची पत्नी सुमलता भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर, त्यांचे स्वागत आहे. अपक्ष उमेदवार म्हणून त्या लढत असतील तर त्यांना पाठिंबा द्यायचा कि नाही याचा विचार पुढे करू,

- बी. एस. येडीयुराप्पा

बेळगाव - राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न काँग्रेसवाले पाहात आहेत. पण, काँग्रेस विसर्जित करा, असे महात्मा गांधी यांनी केलेले आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाळले जात आहे, असे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी व्यक्त केले. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील 22 जागा जिंकू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

सांबरा विमानतळावर माजी मुख्यमंत्री श्री. येडीयुराप्पा यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, देशात पंतप्रधान मोदी यांचा सध्या जोर आहे. राज्यात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्यास राज्यातील युती सरकारही टिकणार नाही. मोदी यांच्या कारभारावर देशातील जनता संतुष्ट आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येणार आहे. राज्य सरकार आपली जबाबदारी आणि कर्तव्य विसरली असल्याने लोकसभेसाठी जनता भाजपला साथ देणार आहे. गुलबर्गामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचा पराभव निश्‍चित आहे. प्रसारमाध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणात ते स्पष्ट झाले आहे. त्या भागातील जनतेमध्ये खर्गे विरोधी लाट आहे. 

मंड्यामध्ये लोकसभेसाठी अद्याप उमेदवार निश्‍चित नाही. पण, अभिनेते अंबरीष यांची पत्नी सुमलता भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर, त्यांचे स्वागत आहे. अपक्ष उमेदवार म्हणून त्या लढत असतील तर त्यांना पाठिंबा द्यायचा कि नाही याचा विचार पुढे करू

 - बी. एस. येडीयुराप्पा

पूर्वीच्याच खासदारांना उमेदवारी दिली जाणार का? या प्रश्‍नावर बोलताना, केवळ एक किंवा दोन जागेसाठी बदल केला जाऊ शकतो. मात्र पूर्वीच्याच खासदारांना उमेदवारीची संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बेळगावातून पुन्हा एकदा खासदार सुरेश अंगडी यांना उमेदवारी दिली जाणार हे निश्‍चित झाले आहे. पत्रकार परिषदेवेळी खासदार अंगडी, खासदार डॉ. प्रभाकर कोरे उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex Chief Minister B S Yeddyurappa comment