अखिलेश यांचे छायाचित्र असलेले रेशनकार्ड रद्द करणार

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

नव्याने देण्यात येणारे रेशनकार्ड हे स्मार्ट कार्ड स्वरुपात असणार आहे. त्यावर बार कोड आणि ते आधार कार्डाशी संलग्न असणार आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे छायाचित्र असलेली सुमारे 2 कोटी 80 लाख रेशनकार्ड रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. या रेशनकार्ड ऐवजी स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहेत.

योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांनी निर्णयांचा धडाकाच लावला आहे. आता त्यांनी अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळात वाटण्यात आलेली रेशनकार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला. या रेशनकार्डवर अखिलेश यादव यांचे छायाचित्र आहे. खाद्य मंत्रालयाकडून याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

नव्याने देण्यात येणारे रेशनकार्ड हे स्मार्ट कार्ड स्वरुपात असणार आहे. त्यावर बार कोड आणि ते आधार कार्डाशी संलग्न असणार आहे. यामुळे गैरव्यवहारावर आळा बसेल, असा दावा करण्यात येत आहे. 

Web Title: ex cm akhilesh yadav photo will remove from ration card