माजी आमदार बसगौडा पाटील यांचे 102 व्या वर्षी निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

 माजी विधानपरिषद सदस्य सहकार महर्षी बसगौडा अप्पयगौडा पाटील (वय 102) यांचे बुधवारी (ता. 20) निधन झाले.
 

संकेश्‍वर- माजी विधानपरिषद सदस्य सहकार महर्षी बसगौडा अप्पयगौडा पाटील (वय 102) यांचे बुधवारी (ता. 20) निधन झाले.

ते माजी मंत्री ए. बी. पाटील यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अमीनभावी (ता. हुक्केरी) येथे गुरूवारी (ता. 20) दुपारी वाजता वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बेळगाव जिल्ह्यात सहकार, शिक्षण आणि सामाजिक कार्यात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले गांधीवादी विचाराचे नेते अशी त्यांची ख्याती होती. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे ते 1974 पासून वीस वर्षे अध्यक्ष होते.

राज्य सहकारी साखर कारखाना महामंडळाचे अध्यक्ष व राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळावर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. दुरदुंडेश्‍वर विद्या संवर्धक संघासह अनेक संघावर बसगौडा पाटील यांनी अध्यक्ष म्हणून काम केले. संकेश्‍वर परिसराच्या विकासाचा त्यांचा मोलाचा वाटा होता.

Web Title: Ex MLA Basgouda Patil Passed Away