मृत्यूबद्दल संशय नाही; पण कारण स्पष्ट करण्याची माजी आमदारांच्या कन्येची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

माझे वडील माजी आमदार संभाजी लक्ष्मण पाटील (वय ६७, रा. बेनकनहळ्ळी) यांच्या मृत्यूबद्दल कोणताही संशय नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांची मुलगी संध्या नितीन पेरनूरकर (रा. भाग्यनगर) यांनी एपीएमसी पोलिस ठाण्याकडे केली. 

बेळगाव - माझे वडील माजी आमदार संभाजी लक्ष्मण पाटील (वय ६७, रा. बेनकनहळ्ळी) यांच्या मृत्यूबद्दल कोणताही संशय नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांची मुलगी संध्या नितीन पेरनूरकर (रा. भाग्यनगर) यांनी एपीएमसी पोलिस ठाण्याकडे केली. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यामुळे शल्यचिकित्सा करून माजी आमदार पाटील यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. 

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, माजी आमदार संभाजी पाटील हे शुक्रवारी (ता. १७) कॅम्पमधील घरी होते. त्यावेळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्यांचे उपचारादरम्यान त्याच रात्री साडेआठच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मृत्यूबद्दल कोणताही संशय नाही. पण, मृत्यू होण्यामागचे नेमके कारण काय, हे स्पष्ट व्हावे, याबाबतची फिर्याद शुक्रवारी (ता. १७) संध्या यांनी एपीएससी पोलिसांत दिली आहे. परंतु, शल्यचिकित्सेचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. एपीएमसीचे पोलिस निरीक्षक वसंत आचार्य पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex-MLA Sambhaji Patil no more follow up