माजी आमदार संभाजी पाटील यांच्या सुनेला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

बेळगाव - मालमत्तेच्या वादातून माजी आमदार संभाजी पाटील यांच्या सुनेला व तिच्या बहिणीला पाच जणांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी (ता. २०) सकाळी ही घटना घडली असून याप्रकरणी साधना सागर पाटील (वय ३१, रा.बेनकनहळ्ळी) यांनी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी रेखा पांडुरंग तांदळे, विनायक पांडुरंग तांदळे, शिल्पा तांदळे (तिघेही रा. एपीएमसी रोड, बेळगाव), लीलाबाई गणपत पाटील, केदारी पिसाळे (दोघेही रा. बेनकनहळ्ळी) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, माजी आमदार संभाजी पाटील यांची सून साधना व त्यांची बहीण रुपा बेनकनहळ्ळी येथील बंगल्यावर होते. त्यावेळी वरील पाच जण त्यांच्या घरात बेकायदेशीररीत्या प्रवेश केला. यावेळी त्यांच्यात झटापट होऊन पाच जणांनी साधना आणि रूपा हिला मारहाण करण्यास सुरवात केली. यात रूपाच्या हाताला दुखापत होऊन रक्‍तप्रवाह झाला. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

घटनेची माहिती शहरभर पसरताच विविध वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी वृत्ताकंनासाठी धाव घेतली. यावेळी साधना यांनी आपल्या जीवितास धोका असल्याचा आरोप पत्रकांरासमोर केला. त्यानंतर सायंकाळी याप्रकरणी साधना यांनी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात वरील पाच जणांविरोधात मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MLA Sambhaji Patil property issue