मल्ल्यांना 'त्या' पंतप्रधानांनी केली मदत- भाजप

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

विजय मल्ल्या यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना पत्र लिहिले होते. त्या कथित पत्रांनंतर संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारने 2011 आणि 2013 मध्ये कर्जे दिली, असा आरोप भाजपने एका अहवालाचा दाखल देऊन केला आहे. 

नवी दिल्ली- हजारो कोटींचे कर्ज घेण्यासाठी विजय मल्ल्या यांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मदत केली, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. 

विजय मल्ल्या यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना पत्र लिहिले होते. त्या कथित पत्रांनंतर संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारने 2011 आणि 2013 मध्ये कर्जे दिली, असा आरोप भाजपने एका अहवालाचा दाखल देऊन केला आहे. 

मल्ल्या यांची कर्जबाजारी कंपनी किंगफिशर एअरलाइन्सला बँकांच्या समूहाकडून कर्ज देण्याची प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी विनंती करणारी ती पत्रं असल्याचा दावा भाजपने केला आहे. 
"मल्ल्या यांनी असे निधी कुठून मिळविले? (काँग्रेसची) बुडती नौका त्यांच्या बुडत्या किंगफिशरला मदत करीत होती का," असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

पात्रा म्हणाले, "आधी घेतलेल्या कर्जांची परतफेड केलेली नसताना मल्ल्या यांना पुन्हा पुन्हा कर्जे देण्यात आली."
एका बँक समूहाकडून 9000 कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली करण्याचा प्रयत्न चालू असताना मल्ल्या मार्च 2016 मध्ये ब्रिटनला निघून गेले. 
 
Web Title: Ex-PM Manmohan Singh Helped Vijay Mallya, Alleges BJP