
माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याच्या अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आला आहे.
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याच्या अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आला आहे.
चिमुकली रडू लागताच बापाने गिळला अवंढा...
मनमोहन सिंग यांना दोन दिवसांपूर्वी अचानक ताप आला होता. शिवाय, अस्वस्थही वाटू लागले होतं. त्यामुळे त्यांना तत्काळ दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नव्या औषधांची रिअॅक्शन झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती, सध्या प्रकृती स्थिर आहे.
रुग्णालयाशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचार पद्धतीला ते चांगला प्रतिसाद देत आहेत. सध्या त्यांना डॉक्टरांनी निरिक्षणाअंतर्गत ठेवलं आहे, डॉक्टरांची एक टीम त्यांची देखभाल करत आहे.
माझ्या पण खात्यात लाखो रुपये जमा झाले...
दरम्यान, मनमोहन सिंग यांच्यावर 2009 मध्ये एम्समध्येच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे सिंग हे सध्या राजस्थानच्या वतीने राज्यसभेचे सदस्य आहेत. डॉ. मनमोहन सिंह हे भारताचे 13वे पंतप्रधान आहेत. त्यांचा कार्यकाल हा 2004 ते 2014 इतका राहिला आहे. शिवाय, ते एक प्रख्यात अर्थतज्ज्ञही आहेत. या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर पदाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली होती.