सुभाष वेलिंगकरांच्या पक्षाला मिळाले निवडणूक चिन्ह

अवित बगळे
शनिवार, 7 जानेवारी 2017

पणजी : गोव्यात भारतीय भाषा सुरक्षा मंचाने स्थापन केलेल्या गोवा सुरक्षा मंच या नव्या राजकीय पक्षाला आज फळा (ब्लॅक बोर्ड) हे निवडणूक चिन्ह मिळाले. प्राथमिक शिक्षणासाठी केवळ भारतीय भाषांतील शाळांनाच अनुदान द्यावे या मागणीसाठीच या पक्षाची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांच्या पुढाकारातून झाली आहे.

कॉंग्रेसच्या सरकारने २०११ मध्ये इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान सुरु केले. त्याविरोधात माजी मुख्यमंत्री (स्व.) शशिकला काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय भाषा सुरक्षा मंच स्थापून हे आंदोलन २०११ साली सुरू करण्यात आले होते. २०१२ च्या निवडणुकीत या प्रश्नावर उभयमान्य असा तोडगा काढू असे भाजपने आश्वासन दिल्याने मागील निवडणुकीत मंचाने भाजपला पाठींबाही दिला होता.

मात्र सत्तेत आल्यावर भाजपने शब्द पाळला नाही. याउलट अनुदान कायम ठेवण्यासाठी विधेयक सादर केले. त्यामुळे २०१५ मध्ये मंचाने पुन्हा आंदोलन सुरु केले. दरम्यानच्या काळात काकोडकर यांचे निधन झाल्याने सर्व धुरा वेलिंगकर यांच्यावर आली. वेलिंगकर यांना संघाने विभाग संघचालक पदावरून मुक्त केल्यानंतर त्या्ंनी संघाचा स्वतंत्र प्रांत स्थापन केला. त्यामुळे संघाला गोव्यात विजयादशमीचे संचलन केवळ एका शहरात घ्यावे लागले होते.

मंचाने आता याच अुनदान बंदीच्या मुद्यावर विधानसभा निव़डणूक लढविण्याचे ठरवून गोवा सुरक्षा मंचाची नोंदणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती आत त्यांना फळा हे चिन्ह मिळाले आहे. या निवडणुकीत मगो व शिवसेनेशी गोवा सुरक्षा मंचाची युती आहे. मंच ७, मगो २२ तर शिवसेना ५ जागा मिळून ४० पैकी ३४ जागा ही युती लढविणार आहे. त्यासाठी भाजपसोबतची पाच वर्षांची युती मगोने याच आठवड्यात संपृष्टात आणली होती.

Web Title: Ex-RSS leader Subhash Velingkar gets Symbol for his new political Party