बारावीच्या उत्तरपत्रिकेतून शिक्षकांना नोटांचे दर्शन..!

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

एका उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने शिक्षकांसाठी लिहिलेली चिठ्‌ठीही सापडली आहे. त्यात लिहिले होते की, सर जी, महोदय माझी तब्बेत खूपच खालावल्याने मी पेपर चांगल्या प्रकारे लिहू शकलो नाही. कृपा करून माझ्यावर दया करा. मी खूप गरीब आहे.'

लखनौ  - परीक्षा सुरू झाली का देवीदेवतांच्या मंदिरात विद्यार्थ्यांची गर्दी दिसू लागते. विशेषतः दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत हे चित्र विशेष करून दिसते. काही जण तर उत्तीर्ण होण्यासाठी नवसही बोलतात. उत्तर प्रदेशमधील एका विद्यार्थ्यांनी यावर कडी करीत उत्तरपत्रिकेतच 50-100 व 500 रुपयांच्या नोटा ठेवल्याचे उघडकीस आले आहे.

फिरोझाबाद जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू आहे. या वेळी ज्यांना पेपर चांगले गेले नाहीत, अशा काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये 50, 100 व अगदी 500 च्या नोटाही शिक्षकांना सापडल्या आहेत. परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी ही लाच विद्यार्थ्यांनी दिली आहे." मात्र आम्ही केवळ गुणवत्ता पाहूनच गुण देणार आहोत. उत्तरपत्रिका तपासणाऱ्या आमच्यापैकी एकही शिक्षकाने हे पैसे स्वीकारलेले नाहीत,' असे एका शिक्षकाने सांगितले.

विद्यार्थ्याची अशीही विनवणी
एवढेच नाही तर एका उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने शिक्षकांसाठी लिहिलेली चिठ्‌ठीही सापडली आहे. त्यात लिहिले होते की, सर जी, महोदय माझी तब्बेत खूपच खालावल्याने मी पेपर चांगल्या प्रकारे लिहू शकलो नाही. कृपा करून माझ्यावर दया करा. मी खूप गरीब आहे.' यातून आणखी एक गोष्ट उघकीस आली, ती म्हणजे परीक्षा केंद्रामध्ये बसविलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या जोडणीत बिघाड झाल्याने ते सुरू नसल्याचे दिसून आले. याबद्दल शिक्षकांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

कॉपीसाठी बंदुकीचा धाक
परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करू द्यावी, म्हणून आग्र्यातील डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठात परीक्षा केंद्रात बंदूक आणून धाक दाखविल्याची घटना नुकतीच घडली. विद्यापीठ प्रशासन व पोलिसांच्या मदतीने याची चौकशी सुरू असल्याचे कुलगुरू डॉ. अरविंद कुमार दीक्षित यांनी सांगितले.

Web Title: examination uttar pradesh