काश्‍मीर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या

यूएनआय
शनिवार, 7 जानेवारी 2017

कालपासून होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे येत्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतल्याचे विद्यापीठाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. या परीक्षा कधी होतील याची माहिती नंतर जाहीर करण्यात येईल

श्रीनगर - येथे होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे काश्‍मीर विद्यापीठाने उद्या (शनिवारी) आणि रविवारी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्याचे आज जाहीर केले. या बर्फवृष्टीमुळे येथील रस्ते घसरडे झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

कालपासून होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे येत्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतल्याचे विद्यापीठाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. या परीक्षा कधी होतील याची माहिती नंतर जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले. काश्‍मीर खोऱ्यात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. दरम्यान, फुटीरतावाद्यांनी आजपासून दोन दिवसांच्या पुकारलेल्या बंदमुळे येथील कार्यालय आणि व्यावसायिक ठिकाणे बंद राहणार आहेत. श्रीनगरसह काश्‍मीर खोऱ्यातील वाहतूक बंद आहे.

Web Title: Exams postponed by in Kashmir