उत्कृष्ट सेवेबद्दल 28 अधिकाऱ्यांना पोलिस पदके

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

गैरव्यवहारांचा तपास करणाऱ्यांचा समावेश
नवी दिल्ली- सत्यम, व्यापमं आणि नोटाबंदीशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांसह 28 अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस पदके जाहीर झाली आहेत.

गैरव्यवहारांचा तपास करणाऱ्यांचा समावेश
नवी दिल्ली- सत्यम, व्यापमं आणि नोटाबंदीशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांसह 28 अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस पदके जाहीर झाली आहेत.

सत्यम कंपनीतील गैरव्यवहाराचा तपास करणारे हैदराबादचे अतिरिक्त संचालक ए. वाय. व्ही. कृष्णा यांना राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहे. त्यांच्या तपासामुळे सत्यमचे प्रमुख रामलिंगम राजू व अन्य सात जणांना जबर दंड झाला. मध्य प्रदेशातील गाजलेल्या व्यापमं गैरव्यवहाराचा तपास करणारे व सध्या चंडीगडचे पोलिस उपमहानिरीक्षक असलेले तरुण गाउबा तसेच नोटाबंदीनंतर बेकायदेशीर चलनव्यवहाराचे अनेक प्रकरणे बाहेर काढणारे चेन्नईचे पोलिस अधीक्षक पी. सी. तेंनमोझी यांनाही उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या अन्य अधिकाऱ्यांमध्ये पोलिस अधीक्षक सुशील प्रसादसिंग, अतिरक्त पोलिस अधीक्षक देवेंद्रसिंग, उपअधीक्षक किशनसिंग नेगी, निरीक्षक बन्सीधर तिवारी, सहायक पोलिस उपनिरीक्षक जी. सत्यनारायण यांचा समावेश आहे.

पोलिस पदक मिळालेल्यांमध्ये ग्यानेंद्र वर्मा, अतुल दिगंबर फुलझेले, के. प्रदीप कुमार, प्रमोद कुमार, ठाकूरसिंह भंडारी, सुरेंदसिंग यादव, निलंबर श्रीकिसन, सचिदानंद रथ, वसंत पवार, शफी मोहमंद, कमलेश कुमार, व्ही. बालाजी, बलिराम यांचा समावेश आहे.

Web Title: Excellent service medals, 28 officers of the Police