राष्ट्रगीतातील 'सिंध' बदला ; काँग्रेस खासदाराची मागणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

देशाच्या राष्ट्रगीतामध्ये असलेला 'सिंध' हा शब्द बदलून त्याऐवजी 'ईशान्य भारत' करा, अशी मागणी काँग्रेसचे खासदार रिपूण बोरा यांनी केली. बोरा यांनी राष्ट्रगीताबाबत असलेल्या संशोधनाची मागणी करत याबाबतचा प्रस्ताव संसदेत सादर केला.

नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रगीतामध्ये असलेला 'सिंध' हा शब्द बदलून त्याऐवजी 'ईशान्य भारत' करा, अशी मागणी काँग्रेसचे खासदार रिपूण बोरा यांनी केली. बोरा यांनी राष्ट्रगीताबाबत असलेल्या संशोधनाची मागणी करत याबाबतचा प्रस्ताव संसदेत सादर केला.

national anthem india

सिंध या शब्दाऐवजी ईशान्य भारत हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. यापूर्वी सिंध हा प्रांत हा भारतामध्ये होता. मात्र, भारताचे विभाजन झाल्याने हा भाग पाकिस्तान गेला आहे. त्यामुळे  सिंध हा शब्द काढून त्याजागी ईशान्य भारत करा, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रगीतामध्ये ईशान्येकडील भागातील राज्याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे हा शब्द काढा, असे ते म्हणाले. 

दरम्यान, यापूर्वी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही सिंध हा शब्द काढावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसच्या खासदाराने ही मागणी केली आहे. 

Web Title: Exclude word Sindh from National Anthem Demands Congress MP Ripun Bora