रेल्वेतील अन्नपदार्थ खाताय? सावधान!

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जानेवारी 2020

- रेल्वेतून दिले जाणारे पदार्थ खाताय? तर मग हे वाचाच...

नवी दिल्ली : रेल्वेतून प्रवास करताना आपण अनेकदा रेल्वेत दिले जाणारे अन्न खात असतो. मात्र, रेल्वेत दिले गेलेले अन्न हे शिळे असल्याचे समल्यावर आपण ते खाणं टाळतोच. असाच एक प्रकार मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस रेल्वेत घडला. या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शिळे अन्न दिले गेल्याची माहिती समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शताब्दी एक्सप्रेस या रेल्वेत मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रवाशांना एक्सपायर झालेला ब्रेड आणि बटर देण्यात आले. प्रवाशांनी हे शिळे अन्न खाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. तसेच यातील काही प्रवाशांना उलटीसारखा त्रास सुरु झाला.

Rail

'फ्री काश्मीर'वरून फडणवीसांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले, की आयआरसीटीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर या कामाचे कंत्राट ज्या कंपनीकडे होते त्याचे कंत्राटही रद्द करण्यात आले असून, त्याबाबत संबंधितांना नोटीसही जारी करण्यात आली आहे.

Image result for rail

दरम्यान, हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. 

मुलीला वाजत होती थंडी; शेकोटीसाठी जाळल्या 14 कोटींच्या नोटा

सुरतमध्ये उपचार सुरु

शिळे अन्न खाल्यानंतर रेल्वेतील काही प्रवाशांची प्रकृती बिघडली. त्यामुळे या प्रवाशांना सुरुत येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

Image result for treatment

ब्रेडला लागली होती बुरशी

यातील एका प्रवाशाने याबाबत माहिती दिली. त्याने सांगितले, की बुरशी लागलेला ब्रेड रेल्वेतून देण्यात आला. रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी जाणूनबुजून अशाप्रकारचे काम केले. रेल्वेकडून अशाप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळले जात आहे, असा आरोपही संबंधित प्रवाशाने केला आहे.

Bread


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expired Bread Butter Served in Mumbai Ahmedabad Shatabdi Express