जीएसटी विवरणपत्रांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

वृत्तसंस्था
रविवार, 9 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

नवी दिल्ली : वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) म्हटले आहे, की जीएसटीआर-9, जीएसटीआर-9 ए आणि जीएसटीआर-9सी ही विवरणपत्रे भरण्यासाठी 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विवरणपत्र भरण्याचे अर्ज जीएसटीच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होणार आहेत. जीएसटीअंतर्गत नोंदणी केलेल्या व्यवसायांना वार्षिक विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. यात विक्री, खरेदी आणि इनपूट टॅक्‍स क्रेडिट (आयटीसी) याची आर्थिक वर्ष 2017-18 मधील माहिती विवरणपत्रामध्ये देणे आवश्‍यक आहे. याआधी जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी 31 डिसेंबर 2018 ही अंतिम मुदत होती. 

उद्योग आणि व्यापार संघटनांनी जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. जीएसटीआर-9 आणि जीएसटीआर-9 सी या विवरणपत्रांमध्ये द्यावयाची संपूर्ण आर्थिक वर्षातील माहिती जमा करण्यास व्यावसायिकांना वेळ लागत आहे. संपूर्ण आर्थिक वर्षातील आकडेवारी ही अतिशय मोठी असल्याने ती एकत्र करण्यातही अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी संघटनांकडून वारंवार होत होती.

Web Title: Extension up to 31st March for GST statements