अस्थानांच्या पथकातील सदस्यांना मुदतवाढ 

पीटीआय
सोमवार, 23 जुलै 2018

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आणि त्यांचे दुसरे सर्वांत वरिष्ठ अधिकारी यांच्यादरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या बातम्या येत असताना केंद्रीय दक्षता आयोगाने काही प्रमुख अधिकाऱ्यांचा विभागातील कार्यकाळ वाढविण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या पथकातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आणि त्यांचे दुसरे सर्वांत वरिष्ठ अधिकारी यांच्यादरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या बातम्या येत असताना केंद्रीय दक्षता आयोगाने काही प्रमुख अधिकाऱ्यांचा विभागातील कार्यकाळ वाढविण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या पथकातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. 

अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, की केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त के. व्ही. चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये एका उपमहानिरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याचाही समावेश असून, अलीकडेच त्यांना त्यांच्या मूळ केडरमध्ये पाठविण्यात आले होते. मात्र, नंतर लगेच या अधिकाऱ्याला विभागात परत बोलावण्यात आले होते.

शिवाय, समितीने अन्य दोन आयपीएस अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीची मुदत वाढविण्याचाही निर्णय घेतला आहे, जे फरार उद्योगपती विजय मल्ल्यासह अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या चौकशीत अस्थाना यांच्यासोबत काम करत होते. 

Web Title: Extension to members of Asthana squad