नवी दिल्ली : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू स्वामी नित्यानंद देश सोडून पळाला असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे. यावर प्रतिक्रीया देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, की स्वामी नित्यानंद भारतात आहे की देशाबाहेर पळाला या बाबत आमच्याकडे कुठल्याही प्रकारची औपचारिक माहिती उपलब्ध नाही.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
नित्यानंदविरोधात मुलांचे अपहरण करुन त्यांचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी नित्यानंदच्या दोन अनुयायांना अटक केली आहे. पुराव्यांची जमावजमव सुरू असतानाच नित्यानंद फरार झाला असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे. अहमदाबाद (ग्रामीण) पोलिस अधिक्षक एस. व्ही. असारी यांनी सांगितले की, नित्यानंदविरोधात कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो देश सोडून पळाला आहे.
पहिलवान ते महापौर; पुण्याच्या मुरलीधर मोहोळांचा राजकीय प्रवास
यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले की, नित्यानंद बाबद आमच्याकडे गुजरात पोलिसांकडून वा गृह मंत्रालयाकडून कोणत्याही प्रकारची औपचारिक माहिती मिळाली नाही. तसेच, त्याच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीसाठी, आम्हाला नित्यानंद प्रत्यक्षात कोठे आहे याची माहिती आवश्यक असून तो ज्या ठिकाणी आहे तेथील राष्ट्रीयत्व त्याच्याकडे आहे का? याची माहिती असणे आवश्यक आहे.