क्रेडिट कार्ड वापरल्याने प्रेयसीसोबत मजा केल्याचे पत्नीला कळाले अन्...

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

क्रेडिट कार्ड बाळगणं हे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं पण नवीनच लग्न झालेल्या पतीला क्रेडिट कार्डचा वापर चांगलाच महागात पडला आहे. लग्नानंतर तीनच दिवसांनी पत्नीशी खोट बोलून पती आपल्या गर्लफ्रेंड सोबत मौज करत असल्याचं पत्नीला कार्डच्या बीलावरून समजलं

अहमदाबाद : क्रेडिट कार्ड बाळगणं हे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं पण नवीनच लग्न झालेल्या पतीला क्रेडिट कार्डचा वापर चांगलाच महागात पडला आहे. लग्नानंतर तीनच दिवसांनी पत्नीशी खोट बोलून पती आपल्या गर्लफ्रेंड सोबत मौज करत असल्याचं पत्नीला कार्डच्या बीलावरून समजलं आणि तिचा संताप झाला. सासरच्या लोकांनीही तिला त्रास द्यायला सुरुवात केल्याने फसवल्या गेलेल्या पत्नीने अखेर पोलिस स्थानकामध्ये तक्रार केली आहे.

अहमदाबादमध्ये हा प्रकार घडला असून एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचं धुमधडाक्यात लग्न झालं. लग्नानंतर तीनच दिवसांनी ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचं आहे असं पत्नीला खोटं सांगून तो शहरातल्याच एका पॉश हॉटेलमध्ये आपल्या गर्लफ्रेंडसोबत थांबला. हॉटेलमध्ये थांबून त्यांने मैत्रिणीसोबत मौज मजा केली आणि तो घरी परतला.

नंतर काही दिवसांनी पत्नीने पतीच्या क्रेडिट कार्डचं बील तपासलं असता त्यात अहमदाबादमधल्या एका हॉटेलच्या पेमेंटची नोंद आढळली. तिला पतीच्या हालचालीविषयी शंका आल्याने तीने आपल्या भावाला माहिती काढायला सांगितली. भावने जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्याला धक्काच बसला. ज्या बहिणीचं लग्न काही दिवसांपूर्वीच झालं होतं तीचा नवरा आपल्या गर्लफ्रेंडसोबत या हॉटेलमध्ये राहिल्याचं त्याला आढळून आलं.

हा प्रकार समजल्याने मुलीलाही जबर धक्का बसला. नवऱ्याने फसवणूक केल्याचं तिने तिच्या सासरच्या मंडळींना सांगितलं. तेव्हा घरच्या मंडळींना मुलाला जाब न विचारता तिलाच छळायला सुरुवात केली आणि तिच्यावर घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणला. न्याय मिळत नसल्याने शेवटी तिने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: extra marital affair exposed in ahamadabad due to credit card bill