'एटीएम' मशिनलाच घातला स्वेटर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 जानेवारी 2018

लाहोल-स्पिती (हिमाचल) - उत्तर भारतात थंडीची लाट आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या हिमवृष्टीने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिशय काडाक्याच्या या थंडीपासून वाचण्यासाठी सगळेच उबदार कपडे घालून बाहेर पडत आहेत. परंतु, हिमाचल प्रदेशात एक आश्चर्यजनक प्रकार बघायला मिळाला. लाहोल-स्पितीमधील एसबीआयच्या बँक कर्मचाऱ्यांनी चक्क एटीएम मशिनलाच स्वेटर घातला आहे. विशेष म्हणजे खास एटीएम मशिनसाठीच हा स्वेटर बनविला आहे. एवढचं नाही तर बँकेने एटीएम मशिनजवळ हिटर देखील बसविले आहे.

हिमवृष्टी आणि थंडीतील अतिशय कमी तापमानामुळे एटीएम मशिन गोठून ते ठप्प होवू नये यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी त्याला हा स्वेटर घातला आहे. कडाक्याच्या थंडीत अनेकदा एटीएम मशिन गोठून ते काम करत नसल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. परिणामी कडाक्याच्या थंडीत पैशांची गरज असणाऱ्यांवर मोठ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ येत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी एटीएम मशिन सुरू रहावे यासाठी स्वेटर आणि हिटरची व्यवस्था केली आहे.

Web Title: extreme cold calls for bank officers in himachal covered atms with customized blankets