
- गेल्या काही दिवसांपासून पावसाने मोठी विश्रांती घेतली
- आता पाऊस महाराष्ट्रासह इतर काही राज्यात पुन्हा जोर धरेल, असा अंदाज
नवी दिल्ली : महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि बिहार या सहा राज्यांत येत्या 5 दिवसांत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. त्यामुळे आता या राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट 2 ते 5 जुलैपर्यंत असणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
गेल्या काही दिवसांपासून पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे. त्यानंतर आता पाऊस महाराष्ट्रासह इतर काही राज्यात पुन्हा जोर धरेल, असा अंदाज आहे. त्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. त्यानंतर आयएमडीने याबाबत नवी माहिती सांगितली आहे. त्यामध्ये भारतातील सहा राज्यात मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असून, 3 आणि 4 जुलैला 200 मिमीपर्यंत पाऊस राहील, अंदाज व्यक्त केला जात आहे, याबाबतची माहिती आयएमडीने बुधवारी दिली.
ऑरेंज अलर्ट
उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवताना हवामान विभागाने या राज्यात 2 ते 5 जुलै दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातील ईशान्येकडील काही भागात जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे तर यातील काही भागात मुसळधार पाऊस बरसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच गुजरात, कच्छ आणि सौराष्ट्र भागात 4 आणि 5 जुलैला मुसळधार पाऊस असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बिहारमध्येही मुसळधार पाऊस
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजात सहा राज्यात मुसळधार पाऊस राहिल असा अंदाज आहे. तर बिहामध्येही शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
महाराष्ट्रात काही भागात पाऊस
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, राज्यातील काही भागात पाऊस बरसत आहे. त्यानंतर आता आयएमडीकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.