अंखी दास यांचा फेसबुकला रामराम; भाजपची बाजू घेतल्याचा झाला होता आरोप

ankhi das resign from facebook
ankhi das resign from facebook

नवी दिल्ली - फेसबुकच्या सार्वजनिक धोरण विभागाच्या प्रमुख अंखी दास यांनी आज त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. फेसबुकवरील द्वेषमूलक मजकूर ब्लॉक करताना पक्षपाती भूमिका घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. फेसबुकवरून व्हायरल होणाऱ्या कंटेटच्या बाबतीत सत्ताधारी भाजपला झुकते माप दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. सामाजिक सेवेसाठी अंखी दास यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून मागील नऊ वर्षांच्या काळामध्ये त्यांनी कंपनीच्या वाढीमध्ये मोठे योगदान दिल्याचे फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे. 

गेल्या काही काळापासून त्यांच्यावर पक्षपात केल्याचा आरोप झाला होता. त्या फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी प्रमुख आहेत. अमेरिकन वृत्तपत्राने केलेल्या गौप्यस्फोटानंतर अंखी दास या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. फेसबुकच्या कंटेट मॉडरेशन पॉलिसीमध्ये भाजपची बाजु घेऊन पक्षपात करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता. फेसबुकने हा आरोप फेटाळला होता. 

गेल्या आठवड्यात संसदीय समितीसमोर फेसबुक प्रतिनिधी म्हणून हजर झाल्यानंतर अंखी दास यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे उलट सुलट चर्चाही होत आहे. दरम्यान, राजीनाम्यानंतर अंखी दास यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, राजीनाम्याचा आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा काही संबंध नाही. अंखी दास यांनी म्हटलं की, जनेतची सेवा करण्याची इच्छा होती आणि त्यासाठीच राजीनामा दिला आहे.

राजीनामा दिल्यानंतर सहकाऱ्यांना अंखी दास यांनी एक मेसेज पाठवला आहे. यामध्ये त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. अंखी दास यांनी म्हटलं की, आपण त्यावेळी एक लहानसा स्टार्टअप होतो. ज्यामध्ये भारताच्या लोकांना एकत्र आणायचा होतं. आता 9 वर्षांनी मला वाटतं की जवळपास आपल्याला जे करायचं होतं ते केलं आहे. याबद्दल मार्क झुकरबर्ग यांना धन्यवाद. कंपनीला चांगला वेळ देता आला आणि पुढेही कंपनीसोबत असू असंही त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com