भारतीय फेसबुक यूजर्सना फटका; झुकेरबर्ग यांचा दुजोरा

Facebook hacked 50 Million users account affected
Facebook hacked 50 Million users account affected

वॉशिंग्टन- सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकच्या कॉम्प्युटर यंत्रणेवर झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्याचा फटका सुमारे पाच कोटी यूजर्सच्या खात्यांना बसल्याच्या वृत्ताला कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आज दुजोरा दिला. या सायबर हल्ल्याचा फटका बसलेल्या यूजर्समध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय यूजर्स असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. फेसबुकच्या यंत्रणेवर झालेला हा आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा सायबर हल्ला मानला जात आहे.

सायबर हल्ल्याचा फटका बसलेल्या खात्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. या सायबर हल्ल्याचा मोठा फटका भारतातील फेसबुकच्या यूजर्सना बसल्याची शक्‍यता आहे. मात्र, नेमक्‍या किती भारतीय यूजर्सची खाती प्रभावित झाली आहेत, हे फेसबुककडून स्पष्ट करण्यात आले नाही.

मंगळवारी हा सायबर हल्ला झाल्याचे उघडकीस आले. पत्रकारांना याबाबतची माहिती देताना झुकेरबर्ग यांनी सांगितले, की सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. एफबीआयसह इतर सरकारी यंत्रणांना कंपनीने याबाबतची माहिती दिलेली आहे. यूजर्सच्या चोरलेल्या माहितीचा हॅकर्सनी दुरुपयोग केला आहे किंवा नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

"व्हिव्ह ऍज फीचर'मधील त्रुटीचा फटका 
फेसबुक यूजर्सना व्हिव्ह ऍज या फीचरच्या माध्यमातून आपले खाते इतरांना कसे दिसते हे पाहण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्यातील त्रुटीचा फायदा उठवत हॅकर्सनी फेसबुकच्या कॉम्प्युटर नेटवर्कवर सायबर हल्ला केल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या हे फीचर निष्क्रिय करण्यात आले असून, सुमारे 9 कोटी यूजर्सना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या खात्यांमध्ये पुन्हा लॉगइन करणे भाग पडल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. 

फेसबुकचा पसारा 
2.70 कोटी - भारतातील यूजर्स 
88 टक्के - 18-29 वयोगटातील ऑनलाइन यूजर्स 
53 टक्के - महिला यूजर्सची संख्या 
47 टक्के - पुरुष यूजर्सची संख्या 
155 - एका यूजर्सला असलेले सरासरी मित्र 
19.7 टक्के - जागतिक ऑनलाइन जाहिरात क्षेत्रातील हिस्सा 
(स्रोत- ऑम्नीकोर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com