फेसबुककडून 58.30 कोटी बोगस अकाऊंट बंद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

बोगस अकाऊंट बंद करण्याशिवाय अश्लील मेसेजेस, दहशतवाद आणि धार्मिक भावना भडकावणाऱ्या फेसबुकच्या काही कोटी पोस्टविरोधातही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : सोशल मीडियातील जगात सर्वात प्रसिद्ध असलेली सोशल नेटवर्किंग साइट 'फेसबुक'ने यावर्षाच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये जवळपास 58 कोटी 30 लाख बोगस अकाऊंट बंद केली आहेत. फेसबुककडून आखण्यात आलेल्या 'फेसबुक कम्युनिटी स्टँडर्ड'चे उल्लंघन यामध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे फेसबुककडून सांगण्यात आले आहे. 

mark zuckerberg

फेसबुकच्या माध्यमातून बोगस अकाऊंट तयार केल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले होते. केंब्रिज अॅनालिटिकाच्या डेटा लिक प्रकरणानंतर वादात सापडलेल्या फेसबुकने दररोज सुरू केल्या जाणाऱ्या बोगस अकाऊंटवर रोख लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार फेसबुकने आत्तापर्यंत तब्बल 58 कोटी 30 लाख बोगस अकाऊंट बंद केली आहेत. फेसबुककडून इतकी मोठी कारवाई होऊनही अजूनही अॅक्टिव्ह अकाऊंट्सपैकी 3-4 टक्के अकाऊंट बोगस असल्याचे फेसबुककडून सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, बोगस अकाऊंट बंद करण्याशिवाय अश्लील मेसेजेस, दहशतवाद आणि धार्मिक भावना भडकावणाऱ्या फेसबुकच्या काही कोटी पोस्टविरोधातही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 

Web Title: Facebook has closed 58 crore 30 lacs bogus accounts