काही मिनिटांच्या खोळंब्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम पुन्हा सुरु

टीम ई-सकाळ
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

- सोशल मीडियापैकी एक असलेल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम गेल्या काही मिनिटांपासून डाऊन होते

नवी दिल्ली : सोशल मीडियापैकी एक असलेल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम गेल्या काही मिनिटांपासून डाऊन झाले होते. त्यानंतर आता फेसबुक, इन्स्टाग्राम पुन्हा रिस्टोअर करण्यात आले. 

फेसबुकच्या युजर्सकडून व्हिडिओ, फोटोज् अपलोड करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी ट्विटरवरून करण्यात येत होत्या. या फेसबुक, इन्टाग्राम डाऊनचा फटका अनेक युजर्सना बसला होता. युजर्सना 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ अडचणी येत होत्या. त्यानंतर आता लगेचच फेसबुक आणि इन्स्टाग्राम पूर्ववत करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facebook instagram now working well after Down