
सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरून एका युवकाचे सुत जुळले. दोघे अखंड प्रेमात बुडाले. तिने त्याला भेटण्यासाठी घरी बोलावले. तो तिच्या गावात पोहचल्यानंतर कळले की ती तीन मुलांची आई आहे.
लखनौः सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरून एका युवकाचे सुत जुळले. दोघे अखंड प्रेमात बुडाले. तिने त्याला भेटण्यासाठी घरी बोलावले. तो तिच्या गावात पोहचल्यानंतर कळले की ती तीन मुलांची आई आहे. शिवाय, गावातील नागरिकांनी त्याला बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली मधील एका युवकाचे फेसबुकवरून एका महिलेसोबत ओळख झाली. पुढे चॅटिंग करताना दोघांमधील मैत्रीचे संबंध प्रेमात झाले. अखंड प्रेमात बुडाल्यानंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही होकार दिला. यामुळे तिला भेटण्यासाठी तो दिल्लीवरून चंदौली गावामध्ये पोहचला. गावामध्ये गेल्यानंतर त्याला संबंधित महिला तीन मुलांची आई असल्याचे समजले. शिवाय, महिलेचा प्रियकर गावामध्ये आल्याचे समजल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. याबाबतची माहिती समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
गौरव कुमार असे युवकाचे नाव आहे. तपासादरम्यान त्याने सांगितले की, 'फेसबुकवरून दोन वर्षांपूर्वी एका युवतीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही चॅटिंग करत आहोत. विवाह करण्याचे ठरल्यानंतर दिल्लीवरून चंदौली गावात दाखल झालो. पण, गावामध्ये पोहचल्यानंतर कळले की ती तीन मुलांची आई आहे. विवाहीत असल्याची माहिती तीने माझ्यापासून लपवली होती. शिवाय, वेगळेच फोटो पाठवले होते. विवाह करण्यासाठी गावात पोहचलो. पण, तिच्या नातेवाईकांनी मला पकडून बेदम मारहाण केली.'