फेसबुकचे कार्यालय बंगळुरात होणार?

फेसबुकचे कार्यालय बंगळुरात होणार?

बंगळूर - देशाची आयटी राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगळूर शहरात फेसबुक या लोकप्रिय सोशल मीडियाचे भव्य कार्यालय लवकरच सुरू होणार आहे. यासाठी २.२ लाख चौरस फुटाचे विस्तीर्ण व सुसज्ज कार्यालय उभारण्यात येणार आहे.

बंगळुरातील एमबीसी गोल्ड लिंक्‍स संकुलात कार्यालय स्थापन करण्यात येणार असून सुमारे २२०० लोकांना रोजगाराची संधी मिळणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. फेसबुकच्या आगमनामुळे जगातील मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांची बंगळुरातील संख्या पाचवर जाणार आहे.

सध्या अॅमेझॉन, ॲपल, मायक्रोसॉफ्ट व गुगल कंपन्यांची कार्यालये बंगळुरात आहेत. जुन्या विमानतळ रस्त्यावर असलेल्या चल्लघटजवळ एमबीसी गोल्ड लिंक्‍स आयटी संकुल आहे. येथे सध्या आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, गोल्डमॅन यासह अनेक कंपन्या आहेत. कंपनी सुरू करण्यात येणाऱ्या इमारतीला वर्षाला ३४ कोटी रुपये भाडे फेसबुक कंपनीने निश्‍चित केले असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com