फेसबुकने 687 पेजेस हटवली, काँग्रेसच्या पेजेसवर मोठी कारवाई

वृत्तसंस्था
सोमवार, 1 एप्रिल 2019

नवी दिल्ली - फेसबुकने आक्षेपार्ह भाषेचा वापर असलेल्या तसेच निलंबित करण्यात आलेली सुमारे 687 फेसबूक पेजेस आणि अकाऊंट्स हटवली आहेत. यामध्ये काँग्रेसच्या आयटी अकाऊंट्स आणि पेजेसवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
 
फेसबूकच्या सायबर सिक्यॉरिटीचे पॉलिसीचे प्रमुख नाथनेल ग्लेचियर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करण्यात आलेल्या अकाऊंट्शी संबंधित व्यक्तींनी आपली ओळख लपवून काम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आम्ही केलेल्या तपासामध्ये ही मंडळी काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असल्याचे उघड झाले होते. त्यांना अकाऊंटच्या वॉलवर असलेल्या माहितीमुळे नाही तर ओळख लपवून केलेल्या अप्रामाणिकपणामुळे हटवण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

फेसबुकच्या स्वयंचलित प्रणालीने आधीच हेरलेल्या आणि निलंबित केलेल्या सुमारे 687 फेसबूक अकाऊंट्स आणि पेजेसवर कारवाई करताना ही पेजेस आणि अकाऊंट्स हटवण्यात आली आहेत. या पेजेसवर प्रकाशित माहितीमुळे नव्हे तर अप्रामाणिक माहितीमुळे कारवाई करण्यात आली आहे. 

Web Title: facebook removes 687 pages accounts linked to congress party