फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इंस्टाग्राम सेवा विस्कळीत !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

जगभरात सोशल मिडीया साईट्स चे सर्वर ़डाउन झाल्याने युजर्सना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

तुमचे फेसबुक नीट हाताळता येत नाहीये?, सोशल मिडीयावरील तुमची कामे रेंगाळली आहेत का? तर थोडे शांत व्हा, कारण असे फक्त तुमच्या सोबतच नाही तर जगभरात कित्येकांसोबत घडत आहे. 

आज सकाळपासून जगभरात फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इंस्टाग्रामला सुरु करण्यात तर काहींना सुरु असलेले सोशल मिडीया साईट्स हाताळण्यात अडचण येत आहे. 

मॉनिटरींग वेबसाइट डाउन डिरेक्टर यांच्या कडून आलेल्या माहितीनुसार, युरोप, अमेरीका, मध्य पूर्व व दक्षिण पूर्व आशिया आणि ब्राझीलमध्ये या समस्येला सोशल मिडीया युजर्सना सामोरे जावे लागत आहे. 

Web Title: Facebook whats app Instagram connectivity issue all over world

टॅग्स