'ती' माहिती उघड करण्यास फेसबुकचा नकार

वृत्तसंस्था
रविवार, 15 जुलै 2018

"डेटा लीक' प्रकरणात फेसबुकने दिलेली माहिती उघड करण्यास केंद्र सरकारने नकार दर्शविला आहे. ही महिती गोपनीय व केवळ सरकारी वापराकरिता असल्याने ती सार्वजनिक करता येणार नाही, असे उत्तर इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती अधिकाराअंतर्गत दाखल झालेल्या अर्जावर दिले आहे. 

नवी दिल्ली - "डेटा लीक' प्रकरणात फेसबुकने दिलेली माहिती उघड करण्यास केंद्र सरकारने नकार दर्शविला आहे. ही महिती गोपनीय व केवळ सरकारी वापराकरिता असल्याने ती सार्वजनिक करता येणार नाही, असे उत्तर इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती अधिकाराअंतर्गत दाखल झालेल्या अर्जावर दिले आहे. 

फेसबुक डेटा लीक प्रकरण उजेडात आल्यानंतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने फेसबुक, तसेच ब्रिटनमधील केंब्रिज अनालिटिका या कंपनीला नोटीस पाठवून खुलासा करण्याची मागणी केली होती. यावर दोन्ही कंपन्यांनी स्पष्टीकरण दिले असून, आपण दिलेली माहिती सार्वजनिक करू नये, अशी विनंतीही या कंपन्यांनी केली असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. 

पीटीआय या वृत्तसंस्थेकडून माहिती अधिकाराअंतर्गत सदरची माहिती मागविण्यात आली होती. दरम्यान, या डेटाचोरीचा फटका भारतातील सुमारे 5 लाख 62 नागरिकांना बसल्याची कबुली फेसबुकने एप्रिल महिन्यात दिली होती. जगभरातील 8.7 कोटी नागरिकांच्या माहितीचा गैरवापर झाल्याचेही समोर आले आहे.

Web Title: Facebook's denial of open this information