
मुख्यमंत्र्यावरून भाजपमध्ये गटबाजी! जेपी नड्डा यांचा दोन दिवसीय राजस्थान दौरा
राजस्थानमध्ये भाजपने २०२३ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Naddas) १० आणि ११ मे रोजी बिकानेर विभागाचा दौरा करणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी सांगितले. यावेळी ते सुरतगडमध्ये संघटनात्मक बैठक घेणार आहे. तसेच हनुमानगडमधील भाजपच्या नवीन जिल्हा कार्यालयाच्या इमारतींचे ऑनलाइन उद्घाटन करणार आहेत. (JP Naddas visit to Rajasthan on May 10)
जेपी नड्डा (JP Naddas) यांनी २ एप्रिल रोजी सवाई माधोपूर जिल्ह्यात एसटी मोर्चाच्या अधिवेशनाला संबोधित केले होते. राजस्थानमध्ये २०२३ च्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे दोन्ही प्रमुख पक्ष काँग्रेस-भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसची कमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे आहे.
हेही वाचा: पुलवामामध्ये दहशतवादी, सुरक्षा दलांमध्ये चकमक; तीन दहशतवादी ठार
राजस्थान (Rajasthan) भाजपमध्ये गटबाजी शिगेला पोहोचली आहे. वसुंधरा आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी कॅम्पमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. नुकतेच भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष राजधानी जयपूरला गेले होते. मुक्कामादरम्यान बी. एल. संतोष यांनी पक्षश्रेष्ठींना शिस्तबद्ध राहण्याचे आवाहन केले होते. बी. एल. संतोष यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, अनावश्यक भाषणबाजीने पक्षाचे नुकसान होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शिस्तीत राहूनच वक्तव्ये करावी.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील भाजपमधील (BJP) गटबाजी शिगेला पोहोचली आहे. मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यावरून सुरू असलेल्या वादात जेपी नड्डा (JP Nadda) यांचा राजस्थान (Rajasthan) दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी गटबाजीचे खंडन केले आहे.
गेहलोत सरकार पंचायत राज संस्था कमकुवत करत असल्याचा आरोप पुनिया यांनी केला आहे. ग्राम स्वराज्य आणि विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून ग्रामपंचायती मजबूत करण्याचे महात्मा गांधींचे स्वप्न होते. परंतु, गेहलोत यांच्या राजवटीत पंचायत राजशी संबंधित योजना ठप्प झाल्या आहेत.
Web Title: Factionalism In The Bjp Jp Naddas Visit To Rajasthan On May 10 Dispute Over Cm Face
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..