आजपासून फैजाबादचे नाव अयोध्या : योगी आदित्यनाथ 

Faizabad, Faizabad Ayodhya, Faizabad district Ayodhya, yogi adityanath, ayodhya deepotsav, ayodhya diwali,
Faizabad, Faizabad Ayodhya, Faizabad district Ayodhya, yogi adityanath, ayodhya deepotsav, ayodhya diwali,

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशमधील फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले असून, या जिल्ह्याचे नाव अयोध्या करण्यात आले आहे, याबाबतची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (मंगळवार) केली. दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली.

यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले होते. या नामांतरमुळे योगी आदित्यनाथ यांच्यावर विविध स्तरातून टीका केली जात होती. त्यानंतर आता त्यांनी फैजाबाद या जिल्ह्याचे नाव बदलले. या जिल्ह्याचे नाव अयोध्या केले आहे. येथील एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ प्रभू रामचंद्रांच्या पुतळ्याबाबत मोठी घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, यावेळी त्यांनी याबाबतचा कोणताही उल्लेख केला नाही. मात्र, अयोध्येत वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार असून, या महाविद्यालयाला राजा दशरथाचे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. 

दरम्यान, दक्षिण कोरियाच्या 'फर्स्ट लेडी' किम जुंग सूक या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमात विविध नेतेमंडळींनी हजेरी लावली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com