स्वयंपाक घरात फोडणी टाकण्यापूर्वी, ही बातमी वाचा!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

बाजारपेठेत बनावट जिरेही आले आहेत. या जिऱ्यांमुळं माणसाला कॅन्सरचा धोका आहे.

नवी दिल्ली : अन्नपदार्थात जिऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिऱ्यामुळे पदार्थाची चव उत्तम बनते. मात्र, आता बनावट जिऱ्यांचा व्यापर केला जात असल्याचे समोर आले आहे. या बनावट जिऱ्याचा व्यापार दिल्ली, गुजरातसह राजस्थानात होत आहे. याच बनावट जिऱ्यामुळे कॅन्सरचा धोका व्यक्त केला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

उत्तर प्रदेशच्या शाहजहाँपूर येथील जलालाबाद येथे या बनावट जिऱ्याचे मुख्य केंद्र आहे. या राज्यातून बनावट जिऱ्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती पुढे येत आहे. या ठिकाणी तयार होणारे जिरे गुजरात आणि राजस्थान या राज्यात पाठविण्यात येत असते. आता याची कंपनी दिल्लीत वाढत आहे. बनावा या शहरातील या कंपनीचा गैरव्यवहार उघडकीस आला. यामध्ये बनावट जिरा तयार होत आहे.Image result for fake cumin"

Photo Source : Hindustantimes.com

दिल्ली पोलिसांनी कंपनीतून सुमारे 19,400 किलो बनावट जिरा, 5250 किलो स्टोन पावडर, 1600 फूल झाडू (जंगली गवत) जप्त केले. तसेच 80 टक्के बनावट जिऱ्याला 20 टक्के शुद्ध जिऱ्यात मिसळले जाते. हेच जिरे उत्तर प्रदेश आणि राजस्थान पाठविण्यास येते. या बनावट जिऱ्यामध्ये रंगही मिसळला जातो. त्यामुळे बनावट जिरे कोणते आणि शुद्ध जिरे कोणते हे ओळखता येऊ शकत नाही.

Image result for fake cumin"

Photo Source : Navbharatimes 

या बनावट जिऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. बनावट गवत, स्टोन पावडरपासून बनवला जाणारा जिरा आरोग्यासाठी हानीकारक आहे. हार्ट केअर फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांनी सांगितले, की बनावट जिऱ्याच्या सेवनाने भविष्यात कॅन्सर होण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे जर तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत बनावट जिरा पोहचत असेल तर तुम्हाला अशा बनावट जिऱ्यापासून सतर्क राहण्याची गरज आहे. बनावट जिरे असल्याचे आढळल्यास याचा वापर करणे टाळले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake cumin is harmful for human being