मुस्लिम आणि दलितांचेच होतात एन्काउंटर

वृत्तसंस्था
बुधवार, 9 मे 2018

योगी सरकारच्या काळात उत्तरप्रदेशात एक वर्षात जवळपास 1200 एन्काउंटर झाले आहेत. परंतु, गुन्हेगारी कमी झाल्याचे दिसत नाही. 

नवी दिल्ली - उत्तरप्रदेशमध्ये एन्काउंटरच्या नावाखाली मु्स्लिम आणि दलितांचेच खुन होतात असा दावा "सिटीजन अगेन्स्ट हेट'' या संस्थेने केला आहे. मानवधिकारासाठी काम करणारी ही एक स्वंयसेवी संस्था आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय मानवधिकार आयोगाने चौकशी करावी अशी मागणीही या संस्थेने केली आहे. 

उत्तरप्रदेशात 2017-2018 मध्ये झालेल्या एन्काउंटरच्या माहीतीच्या आधारे त्यांनी हा दावा केला आहे. एन्काउंटरच्या नावाखाली हे खून केलेले आहेत, त्या खूनांची चौकशी आयोगाने करावी अशी मागणी 'सिटिजन अगेन्स्ट हेट' या संस्थेच्या शिष्टमंडळाने केली आहे. तसेच मानवधिकार आयोगाचे अध्यक्ष एच. एल. दत्तू यांचीही त्यांनी यासंदर्भात भेट घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण यांनी हे एन्काउंटर नसून हत्या असल्याचा आरोप योगी सरकारवर केला आहे. तसेच कोणताही न्याय न करता या हत्या  केल्या आहेत. कुठलीही निष्पक्ष चौकशी न करताच या हत्या करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय मानवधिकार आयोगाने उत्तर प्रदेशात त्यांची स्वंतंत्र टीम पाठवून या प्रकरणाची चौकशी करायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

योगी सरकारच्या काळात उत्तरप्रदेशात एक वर्षात जवळपास 1200 एन्काउंटर झाले आहेत. परंतु, गुन्हेगारी कमी झाल्याचे दिसत नाही. 

Web Title: fake encounter in uttarpradesh