प्राप्तीकर अधिकाऱ्याचा बनाव करणाऱ्या तिघांना अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश): प्राप्तीकर अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश): प्राप्तीकर अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील कांधला-बुधाना रस्त्यावरून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस अधिकारी अनुराधा सिंघल यांनी माहिती दिली. नितीन कुमार, सुशील आणि बबलू अशा तीन जणांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले आहे. हे तिघे जण परिसरातील लोकांची फसवणूक फरार होण्याच्या मार्गावर होते. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक एसयूव्ही वाहन, मोबाईल फोन्स आणि काही रोख रक्कम सापडली आहे. तिघांचीही चौकशी करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केली होती. त्यानंतर काही व्यक्ती प्राप्तीकर अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बंगळूरमध्ये प्राप्तीकर अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून तब्बल एक कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.

Web Title: Fake IT officers arrested