'फेक न्यूज' कर्करोगासारखी : सुब्रमण्यम स्वामी

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

'फेक न्यूज'बाबत केंद्र सरकारकडून महत्वाची पावले उचलली जात आहेत. या फेक न्यूजबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, की फेक न्यूज ही आता कर्करोगासारखी झाली आहे. त्यामुळे त्याला आता शस्त्रक्रियेची गरज आहे.

न्यूयॉर्क : 'फेक न्यूज'बाबत केंद्र सरकारकडून महत्वाची पावले उचलली जात आहेत. या फेक न्यूजबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, की फेक न्यूज ही आता कर्करोगासारखी झाली आहे. त्यामुळे त्याला आता शस्त्रक्रियेची गरज आहे.  

Fake news

कोलंबिया बिझनेस स्कूल येथे 14 व्या वार्षिक व्यापार परिषदेत सुब्रमण्यम स्वामी बोलत होते. ते म्हणाले, फेक न्यूज हा एक कर्करोगाचा प्रकार होत चालला आहे. त्यामुळे आपल्याला आता याप्रकारासाठी शस्त्रक्रियेची गरज आहे. लोकशाही असलेल्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधानाने दिलेली परवानगी दिली आहे. आजची माध्यमं ही खरोखरच तळागाळातील लोकांशी जुळलेले माध्यमं आहेत. फेक न्यूजमुळे प्रसिद्धी मिळण्याऐवजी नावलौकिकपणा गमावण्याची वेळ येते. 'फेक न्यूज' ही आता कर्करोगासारखी झाली आहे. त्यामुळे त्याला आता शस्त्रक्रियेची गरज आहे. 

 

Web Title: Fake news like cancer its needs surgery says Subramanian Swamy