Fact Check: सरकारकडून ऑनलाईन शिक्षणासाठी 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज मिळणार का?

भारत सरकार ऑनलाईन शिक्षणासाठी भारतीयांना 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देणार आहे, अशा आशयाचा मेसेज जर तुम्ही वाचला असेल तर सतर्क राहा.
Fake News
Fake Newsटिम ई सकाळ

सध्या देशात फेक मेसेजचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सोशल मिडीयावर असे अनेक फेक मेसेज फॉर्वर्ड केले जातात. अशातच सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. भारत सरकार ऑनलाईन शिक्षणासाठी भारतीयांना 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देणार आहे, अशा आशयाचा मेसेज जर तुम्ही वाचला असेल तर सतर्क राहा. कारण अशी कुठलीही योजना भारत सरकार जाहीर करण्यात आलेली नाही. यावर पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) या ट्वीटर अकाऊंटवरुन या संदर्भात हा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज खोटा असल्याची माहिती दिली आहे सोबत अशाप्रकारची भारत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट सांगितले.

Fake News
भाजप हा दंगाबाज आणि भ्रष्ट पक्ष, ममता बॅनर्जी यांची टीका

या व्हॉट्सअ‍ॅप मेसेज मध्ये एअरटेल, जिओ आणि Vi सीम युजर्सला 3 महिन्यांसाठी हा ऑफर्स असणार असल्याचे सांगितले आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करण्याचेही सांगितले आहे.

पीआयबीने सांगितल्याप्रमाणे हा मेसेज खोटा असुन दिलेल्या अनोळखी लिंक वर क्लिक करणं धोकादायक आहे. आपली खाजगी माहिती गोळा करुन याचा दुरूपयोग होऊ शकतो. त्यामुळे यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबी कडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com