गुजरातमध्ये बनावट नोटा छापण्याचे मशीन जप्त

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

अहमदाबाद - गुजरातमधील खेडा जिल्ह्यात गुजरात पोलिसांनी बनावट नोटा छापण्याचे मशीन जप्त केले असून, दोन हजार रुपयांच्या 12.45 लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

खेडा जिल्ह्यातील बोपाल गावातील एका बंगल्यात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा छापण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी रात्री या बंगल्यावर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन, काही कागद जप्त केले आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

राजकोटमध्ये दोन दिवसांपूर्वी एकाला अटक करण्यात आली होती. त्या व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. या व्यक्तीकडे दोन हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

Web Title: Fake note printing machine seized from a bungalow in Ahmedabad