''IAS अधिकाऱ्याचा फोन आला''; TMC खासदाराने घेतली 'फेक' लस

Mimi Chakraborty
Mimi Chakraborty
Summary

स्वत:ला भारतीय प्रशासकीय अधिकारी (IAS officer) सांगणाऱ्या आणि हजारो लोकांना फेक लस देण्याचे कॅम्पेन चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार मीमी चक्रवर्ती (MP Mimi Chakraborty) यांनाही फेक कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली होती.

कोलकाता- स्वत:ला भारतीय प्रशासकीय अधिकारी (IAS officer) सांगणाऱ्या आणि हजारो लोकांना फेक लस देण्याचे कॅम्पेन चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार मीमी चक्रवर्ती (MP Mimi Chakraborty) यांनाही फेक कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Fake Vaccine Probe After MP Mimi Chakraborty Gets Jab At Suspect Event)

फेक लसीकरण कॅम्पेनमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हजारो लोकांना देण्यात आलेली लस खरी होती का? असा प्रश्व विचारला जात आहे. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. मीमी चक्रवर्ती यांनी पोलिसात याप्रकरणी तक्रार केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांना कोणतीही पुष्टी मिळाली नव्हती. त्यांना मेसेजही आला नव्हता. अॅक्टर आणि राजकीय नेत्या असलेल्या मीमी चक्रवर्ती फेक लसीकरण कॅम्पच्या प्रमुख पाहुणे म्हणून गेल्या होत्या. याठिकाणी त्यांनीही लस घेतली होती.

Mimi Chakraborty
नव्या IT नियमांविरोधात 13 न्यूज संस्थांची हायकोर्टात धाव

पोलिसांनी याप्रकरणी दक्षिण कोलकात्तामधील देबांजन देव नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. चक्रवर्ती म्हणाल्या की, लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी कार्यक्रमाला जाण्याचा आणि लस घेण्याचा निर्णय घेतला. जवळपास २५० लोकांनी कॅम्पमध्ये लस घेतली होती. देबांजन देव याने स्वत:ला आयएएस अधिकारी सांगत मीमी चक्रवर्ती यांना लसीकरण कार्यक्रमाला बोलावलं होतं. ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण ड्राईव्ह असल्याची बतावणी देव याने चक्रवर्ती यांना केली होती. एएनआयशी बोलताना चक्रवर्ती यांनी ही माहिती दिली आहे.

Mimi Chakraborty
कोवॅक्सिन दोन वर्षांच्या मुलांवर काम करणार का?

लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी मी कॅम्पमध्ये कोविशिल्डचा डोस घेतला. पण, मला कोविनकडून कन्फर्मेशन मेसेज मिळाला नाही, असं चक्रवर्ती म्हणाल्या. लसीकरणासाठी लोकांचा आधारकार्ड क्रमांक घेण्यात आला होता. पण, कोणाला मेसेज आला नाही. त्यामुळे मला शंका आली आणि मी पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला, असं त्या म्हणाल्या. पोलिस याप्रकरणात तपास करत आहेत. शिवाय यामागे काही मोठे रॅकेट आहे का? याचाही शोध घेतला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com