पुलवामा हल्याचा म्हणून वेगळाच व्हिडिओ व्हायरल

navi-dilli
navi-dilli

नवी दिल्ली - पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) सुमारे 39 जवान हुतात्मा झाले. या हल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. सोशल मिडियावर याबाबत अनेक पोस्ट सध्या बघायला मिळत आहे. असे असतानाच इराक मधल्या एका स्फोटाचे सीसीटिव्हि फुटेज पुलावामामधल्या हल्याचा असल्याचे व्हायरल झाले आहे. पुलावामा हल्याच्या व्हिडिओ म्हणून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. 

सुरुवातील हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला. परंतु, सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची सतत्या पडताळणाऱ्या बूम लाईव्ह या वेबसाईटने हा पुलवामा येथील नसून, इराकमधल्या एका स्फोटाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. 

तसेच या व्हिडिओचे चित्रण 2007 मध्ये झाले असल्याचेही बूम लाईव्हने म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com