esakal | Video : ‘ओन्ली इन इंडिया’; कुत्रा-कोंबडी अन् ते सात जण...
sakal

बोलून बातमी शोधा

Family of 7 Rides on Bike with 2 Dogs and Hen  Video viral

एका दुचाकीवर दोन कुत्रे अन् सात जण प्रवास करताना दिसत असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video : ‘ओन्ली इन इंडिया’; कुत्रा-कोंबडी अन् ते सात जण...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्लीः एका दुचाकीवर दोन कुत्रे अन् सात जण प्रवास करताना दिसत असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘ओन्ली इन इंडिया’ या शीर्षकाखाली हा व्हिडिओ आहे.

रिशद कपूर यांनी ट्विटरवरून व्हिडिओ अपलोड केला असून, ‘ओन्ली इन इंडिया’ हे शीर्षक दिले आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही व्हिडिओ शेअर झाल्यानंतर व्हॉट्सऍपवरूनही व्हायरल होऊ लागला आहे. दुचाकीवर एकूण सात जण प्रवास करताना दिसत आहे. शिवाय, दोन कुत्रे व एक कोंबडीही आहे. दुचाकीवर सात जणांसह मोठ्या प्रमाणात वस्तूही दिसत आहेत.

दुचाकी चालवणाऱया व्यक्तीला पुरस्कार दिला पाहिजे. जीवघेणा प्रवास आहे, अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी नेटिझन्स प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एकाने म्हटले आहे, 'मला या कुटुंबाची ईर्षा वाटते कारण, हे धोकायदायक असल्याचे माहिती असतानाही या गरीब कुटुंबात एकमेकांबद्दल किती विश्वास आहे. अनेकांना अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचा विश्वास बांधून ठेवता येत नाही.' दुचाकी चालवणारा खरा हिरो आहे, त्याच्याकडे आपल्या जीवनात संतुलन राखण्याची कला आहे, असेही एकाने म्हटले आहे. एखाद्या पोलिसाने दुचाकी चालकाला अडवले तर कोणकोणत्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पैसे घेईल, असेही एकाने म्हटले आहे.

loading image
go to top