उत्तर प्रदेशमध्ये 'फॅमिली ड्रामा' : नायडू

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी उत्तर प्रदेशमध्ये 'फॅमिली ड्रामा' सुरू असल्याचे म्हटले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना नायडू म्हणाले, "हे केवळ नाटक आहे. एक "फॅमिली ड्रामा'. कधी तेथे विनोद होतो तर कधी गोडवा निर्माण होतो. मात्र शेवट शोकांतिकेनेच होतो. आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील जनता त्यांच्या पक्षाला (समाजवादी पक्ष) नाकारणार आहे. कौटुंबिक कलहामुळे ते आणखी कमकुवत झाले आहेत.'

दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर, प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांना पदावरून हटविण्यात आले आहे. आज झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतची घोषणा करण्यात आली. "पक्षाचे वरिष्ठ नेते मुलायमसिंह यादव (नेताजी) यांच्याबाबत मला किती आदर आहे, हे पूर्ण देशाला माहिती आहे. त्यांच्याबद्दल मला पूर्वीही आदर होता आणि आताही आहे. नेताजींविरोधात कोणी बोलत असेल तर, त्याला विरोध करण्याचे माझे काम आहे. माझ्या आयुष्यात नेताजींचे मोठे स्थान असून, त्यांच्यासाठी मी काहीही त्याग करण्यास तयार आहे', अशा प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Family drama in Uttar Pradesh : Naidu