हुतात्मा जवानांच्या कुटुंबाला ना मिळाले पैसे ना जमीन...

The family of martyrs in Pulwama terror attack cannot afford 50 lakhs No land gained
The family of martyrs in Pulwama terror attack cannot afford 50 lakhs No land gained

जयपूर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना मदतीची विविध आश्वासने देण्यात आली. मात्र, अद्यापही काही कुटुंबियांना ना पैसे मिळाले ना जमीन. स्थानिक प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसारीत केले आहे.

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती. या घटनेचा बदला म्हणून सरकारने बालाकोट येथे हवाई हल्ला करून बदला घेतला. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र, यापैकी अनेक जवानांच्या कुटुंबीयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नसल्याचे समोर येत आहे.

राजस्थानमधील हवालदार हेमराज मीणा हे पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राजकीय नेत्यांची रीघ लावली होती. सरकारी पातळीवरून त्यांना विविध आश्वासने देण्यात आली. हेमराज यांच्या पत्नीला 50 लाख रुपये रोख किंवा 25 लाख रुपये रोख आणि 25 हेक्टर जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आई-वडिलांना आर्थिक मदत आणि मुलांना मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, घटनेला पाच महिने उलटून गेले असून, अद्यापही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.

हुतात्मा जवान हेमराज यांचे वडील हरदयाल मीणा यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, 'हेमराज हुतात्मा झाल्यानंतर अनेक जण भेटायला आहे होते. आम्ही तुमच्यासोबत आहोत, काळजी करू नका. हेमराज हा देशासाठी हुतात्मा झाला आहे. पण, आम्हाला तुमचा मुलगा समजा. आम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ, अशी आश्वासने दिली. मात्र, आमची काळजी घेण्याची गोष्ट सोडा, पण नंतर कुणी साधे भेटायलाही आले नाहीत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com