Cyclone Fani : पश्‍चिम बंगालमध्ये धडकले 'फणी'

Cyclone Fani : पश्‍चिम बंगालमध्ये धडकले 'फणी'

भुवनेश्वर, कोलकता : ओडिशाच्या अनेक भागांमध्ये हाहाकार उडवून देणाऱ्या फणी चक्रीवादळाने आज सकाळी पश्‍चिम बंगालमध्ये प्रवेश केला. फणी चक्रीवादळाची तीव्रता आज काही प्रमाणात कमी झाली असून, ते बांगलादेशच्या दिशेने सरकत आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या चक्रीवादळामुळे पश्‍चिम बंगालला फारसा धोका नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. "फणी'मुळे पश्‍चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या पश्‍चिम बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. फणी चक्रीवादळामुळे पश्‍चिम बंगालला धोका नसल्याचे विभागीय हवामान विभागाच्या उपसंचालकांनी सांगितले. या चक्रीवादळाची तीव्रता हळूहळू आणखी कमी होईल, असेही सांगण्यात आले. 

ओडिशाच्या राजधानीत मोठे नुकसान

फणी चक्रीवादळाने शुक्रवारी ओडिशाच्या अनेक भागांना जोरदार तडाखा दिला. ओडिशात 12 जण मृत्युमुखी पडल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ओडिशात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. शनिवारी मदतकार्याने वेग घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ओडिशातील सुमारे दहा हजार गावांना फणीचा फटका बसला आहे. मदतकार्यात एक लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले असल्याची माहिती ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिली. पटनाईक यांनी आज नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी करीत परिस्थितीचा आढावा घेतला. राजधानी पुरीमध्ये मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com