#MeToo : साजिदला प्रायश्चित करावेच लागेल : फराह खान

वृत्तसंस्था
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे त्याच्याविरुद्ध सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर अक्षयकुमारने केलेल्या मागणीनुसार हाऊसफूल 4 चित्रपटाचे चित्रिकरणही थांबविण्यात आले आहे. या सर्व प्रकरणात साजिदची बहिण फराह खाने भावाला पाठिंबा न देण्याचे स्पष्ट केले आहे. 

मुबंई : #MeToo मोहिमेचे वादळ आता चांगलेच पेटले असून सर्व स्तरातील महिला त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवत आहेत. दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे त्याच्याविरुद्ध सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर अक्षयकुमारने केलेल्या मागणीनुसार हाऊसफूल 4 चित्रपटाचे चित्रिकरणही थांबविण्यात आले आहे. या सर्व प्रकरणात साजिदची बहिण फराह खाने भावाला पाठिंबा न देण्याचे स्पष्ट केले आहे. 

#MeToo मोहिमेअंतर्गत अभिनेत्री सलोनी चोप्रा आणि पत्रकार करिष्मा यांनी साजिदवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. ''हा माझ्या परिवारासाठी अत्यंत दु:खद काळ आहे. माझ्या भावाची यात चूक असेल तर त्याला प्रायश्चित करावेच लागेल, आणि यात मी त्याला पाठिंबा देणार नाही.'' अशा आशयाचे ट्विट फराहने केले आहे.  

फराह खानशिवाय फरहान अख्तर यानेही साजिद खानवर टीका केली आहे. ''साजिद खानबदद्लच्या बातम्या वाचून मला प्रचंड धक्का बसला, निराशा झाली. कसे ते मला ठाऊक नाही मात्र साजिदला या कृत्यासाठी  प्रायश्चित करावे लागेल,'' असे ट्विट त्याने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farah khan denied to support sajid khan