विमान कंपन्यांकडून तिकीटदरात सवलत

पीटीआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

जेट एअरवेज, इंडिगो आणि गो एयर या विमान कंपन्यांनी जाहीर केलेल्या योजनेनुसार रेल्वे तिकिटांच्या किमतीमध्ये विमान प्रवास करता येणार आहे. जेट एअरवेजने 999 रुपये, तर इंडिगोने 949 रुपयांपासून पुढे तिकीटविक्री सुरू केली आहे.

नवी दिल्ली - नव्या वर्षामध्ये भारतीय विमान कंपन्यांनी तिकीटदरात सवलत देण्यास सुरवात केली आहे. जेट एअरवेज, इंडिगो आणि गो एयर या विमान कंपन्यांनी जाहीर केलेल्या योजनेनुसार रेल्वे तिकिटांच्या किमतीमध्ये विमान प्रवास करता येणार आहे. जेट एअरवेजने 999 रुपये, तर इंडिगोने 949 रुपयांपासून पुढे तिकीटविक्री सुरू केली आहे.

इंडिगोच्या योजनेनुसार कोईमतूरपासून चेन्नई 949 रुपये, दिल्ली ते जयपूर 1042 रुपये, चेन्नई ते बंगळूर 1187 रुपये, चेन्नई ते दिल्ली 2832 रुपयांमध्ये तिकीटविक्री सुरू करण्यात आलेली आहे.

Web Title: Fare Concession from Airlines