विजेच्या धक्क्याने बेळगावात शेतकऱ्याचा मृत्यू

अमृत वेताळ
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

बेळगाव : शेतावर गवत आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वीजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. 

आप्पाणा जिनाप्पा शंकरगौडा (वय 55, रा. अलारवाड) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ही दुर्घटना शनिवारी (ता. 25) सकाळी 11 वाजता अलारवाड (ता. बेळगाव) येथे उघडकीस आली. घटनेची नोंद माळमारुती पोलीस ठाण्यात झाली आहे. अप्पांना हे आज सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी गवत आणण्यासाठी शेतीवर गेले होते. खांबावरीक उच्च दाबाची विधुत वहिनी तुटून खाली पडली होती. तिला अप्पांना यांचा स्पर्श झाल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला. काही वेळानंतर ही घटना उघडकीस आली. माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer died due to electricity shock