दिल्लीत शेतकरी मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 1 डिसेंबर 2018

करण संत असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. करण संत हे शेतकरी मोर्चासाठी कोल्हापूरहून दिल्लीत आले होते. मात्र, पहाडजंग येथील आंबेडकर भवनात तिसऱ्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकरी संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा पहाडगंज येथील आंबेडकर भवनात तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सध्या केला जात आहे.

करण संत असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. करण संत हे शेतकरी मोर्चासाठी कोल्हापूरहून दिल्लीत आले होते. मात्र, पहाडजंग येथील आंबेडकर भवनात तिसऱ्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. या मोर्चासाठी खासदार राजू शेट्टीही काल (शुक्रवार) सहभागी झाले होते. करण संत हे तिसऱ्या मजल्यावरुन खाली कसे कसे पडले, याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक तपास करत आहेत, असे अतिरिक्त पोलिस उपायुक्त अमित शर्मा यांनी दिली.

Web Title: Farmer of Kolhapur Died after collapse from Building Delhi