भन्नाट आयडिया ! शेतात पेरणी झाली; उरलेल्या बियाणांच करायचं काय ? म्हणून थेट डिव्हायडरमध्ये लावले सोयाबीन

MP Banner
MP Banner

पुणे : आजही आपल्याला दोन वेळचं जेवण मिळतंय ते फक्त शेतकऱ्यांमुळेच. आपले शेतकरी धान्य पिकवतायत, म्हणून आपण जगतोय. बरोबर ना? प्रत्येकांना ज्यांच्या त्यांच्या कामामधून आराम घेता येतो आणि सुट्टीही मिळते. परंतु आपला हा शेतकरी बारा महिने शेतात काबाडकष्ट करून दिवसाची रात्र करून राबत असतो. आपलं धान्य कसं पिकेल, त्याची वाढ करण्यासाठी त्याची निगा कशी राखली पाहिजे, याची चिंता त्याला सतावत असते. आणि आपण काहीतरी करून आपल्या लोकांसाठी धान्य पिकवल पाहिजे, यासाठी काही ना काही कल्पना करून शेतात प्रयोग करत असतो. त्याचपद्धतीने मध्य प्रदेशमधील एका शेतकऱ्याने एक आगळा वेगळा प्रयोग केला आहे. त्याचा तो प्रयोग अनेकांना आवडलाही आहे. या शेतकऱ्याने काय आणि कोणता असा प्रयोग केला आहे की त्याची इतकी चर्चा सुरु आहे बरं? हे जाणून घेऊयात... 

आपण सर्वांनीच लहानपणापासून प्रवास केला असेलच... लहानपणी मामाच्या गावाला जाताना बस, रेल्वेमधून प्रवास करताना आपल्याला अनेक रस्ते, मोठमोठी झाडं आणि आपल्यासोबत ये जा करणारी वाहनं दिसत असतातच. त्यातच मोठंमोठ्या राज्य - राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर आपण आलो तर तो रस्ता तर खूपच मस्त वाटतो, बरोबर ना... तुम्ही कल्पना ही करत असाल. त्यातच मध्यप्रदेशमधील एका शेतकऱ्यांने बैतूल- भोपाळ महामार्गावरील दुभाजकामध्ये चक्क सोयाबीनची शेती केली आहे. 

ज्यावेळेस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार समजला, त्यावेळी त्या ही लोकांना विश्वास बसला नाही.  (एन.एच.ए.आय.) यांच्याकडे या महामार्गावरील कामाचे कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यावेळी हे काम करताना तेथील अधिकाऱ्यांना त्या मार्गावरील दुभाजक अचानक हिरवेगार दिसू लागले होते. हा सर्व प्रकार पाहताच अचानक हे असे कसे झाले? कुणी केले असेल? आणि हे शेत कसे तयार झाले असेल? असे एक ना अनेक प्रश्न त्या अधिकाऱ्यांना पडले होते. त्यावेळी हा प्रकार गावातील तहसिलदारापर्यंत पोहचला. त्यावेळी दुभाजकावर सोयाबीनचे शेत उगवले ते सुद्धा ती शेती पाहून थक्कच झाले. हे सर्व प्रकार समजताच तेथील अधिकाऱ्यांनी त्या शेतावरील जागेची पाहणी आणि चौकशी केली तर १० फूट रुंद आणि ३०० फूट लांब दुभाजकामध्ये त्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे शेत बनवलं आहे असे समजले. 

त्यानंतर हा सर्व प्रकार समजताच ज्या शेतकऱ्यांनी हे सर्व केले आहे. त्याची सविस्तर चौकशी केली तर मध्यप्रदेश मधील लल्ला यादव असे त्या शेतकऱ्याचे नाव असल्याचं त्यांना समजलं यादव यांनी त्यांच्या शेतातील पेरणी केल्यावर बाकी शिल्लक राहिलेले बी-बियाणं असंच खराब होऊ नये, यासाठी आपल्या शेतातून बाहेर येऊन महामार्गावरील दुभाजकामध्ये बियाणं आणून टाकले आहे हे सर्वाना समजले. 

यादव यांची चौकशी केली त्यावेळी ते म्हणाले, माझ्या शेतात मी पेरणी केल्यानंतर त्यातील काही बी बियाणं शिल्कक राहिले होते. ती बियाणे अशीच खराब होतील. यामुळे ती दुभाजकांमध्ये टाकली आणि काही दिवसांनी त्यात सोयाबीनची रोप येऊ लागली. त्यानंतर त्या रोपांना यादव यांनी पाणी आणि औषध दिले आहे 

तहसिलदार ओमप्रकाश चोरमा यांनी एका नावाजलेल्या वृत्त वहिनीला बोलताना या सर्व प्रकारची माहिती दिली की, आम्ही याबद्दल सर्व माहिती घेत आहोत तसेच त्या शेतकऱ्याने असे का आणि कशासाठी केले हे सुद्धा जाणून घेणार आहोत. पुढील काही दिवसांनंतर अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल.  

या सर्व प्रकारामुळे तिथल्या स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेत त्या शेतकऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रकारामुळे मध्य प्रदेश मधील अधिकारी यादव यांनी पिकवलेल्या शेतीवर नेमका कसा आणि कोणता निर्णय घेतील याची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com