वाघ नव्हे तर कुत्रा आहे? पण असं का...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

कर्नाटकमध्ये माकडांची संख्या जास्त असल्यामुळे शेतकऱयांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. माकडांपासून सुटका होण्यासाठी एका शेतकऱयाने शक्कल लढवली.

बंगळूरूः कर्नाटकमध्ये माकडांची संख्या जास्त असल्यामुळे शेतकऱयांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. माकडांपासून सुटका होण्यासाठी एका शेतकऱयाने शक्कल लढवली अन् आपल्याकडील कुत्र्याला वाघासारखे रंगवले. कुत्र्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेतकरी श्रीकांत गोवडा या शेतकऱयाने त्यांच्याकडील कुत्र्याला वाघाचा रंग दिला. या कुत्र्याला पाहिल्यानंतर माकडे पळून जाऊ लागली. शिवाय, कुत्र्याचे व वाघाची छायाचित्रे काढून मोठे मोठी पोस्टस शेतीमध्ये लावली आहेत. शिवाय, रंग दिलेला कुत्रा तिथे दिसत असल्यामुळे माकडे जवळसुद्धा फिरकत नाहीत व पिकांचेही नुकसान होत नाही, असे गोवडा यांनी सांगितले.

सोशल मीडियावरून कुत्र्याचे छायाचित्र व्हायरल होत आहे. शिवाय, कुत्रा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करू लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Paints Dog to Look Like Tiger to Scare Away Raiding Monkeys in Karnataka